people of the village scared from corona vaccine jumped into the river
उत्तर प्रदेश : एकीकडे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लस घेण्याकरिता देशभरातील आरोग्य केंद्रांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. तर बाराबंकीमध्ये एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. आरोग्य विभागाची टीम एका गावात कोरोना लस देण्यासाठी पोहोचली, मात्र मेडिकल टीमला बघताच काही ग्रामस्थांनी लसीकरण टाळण्यासाठी सरयू नदीत उड्या घेतल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, रामनगरच्या सिसोदा गावात शनिवारी आरोग्य विभागाची टीम गावकऱ्यांना कोरोनाची लस देण्यासाठी गेली होती. मात्र, लसीची भीती मनात असल्यामुळे बहुतेक गावकरी गावाबाहेरच्या सरयू नदीजवळ उभे होते. मेडिकल टीमला बघताच त्यांनी नदीत उड्या घेतल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या लोकांना बोलावून समजावून सांगितले. तरीदेखील केवळ 14 जणांनी लस घेतली. या गावात वेगाने पसरणार्या कोरोना संसर्गानंतर आरोग्य विभागाची टीम शनिवारी लसीकरणासाठी आली होती.
दिलासादायक : भारतात बनलेली नेजल व्हॅक्सिन लहान मुलांसाठी ठरू शकते गेम चेंजर, WHO चा दावा
उपजिल्हाधिकारी राजीव शुक्ला यांनी या संदर्भात सांगितले कि, “मी गावकऱ्यांना समजवायला गेलो होतो. पण त्यांनी नदीत उड्या घेतल्या. त्यानंतर त्यांना समजावून सांगितले. त्यानंतरही केवळ 14 लोकांनी पुढे येऊन लस घेतली.” दरम्यान, या घटनेमुळे लोकांच्या मनात कोरोना लसीविषयी असलेली भीती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. लोकांच्या मनातील ही भीती घालवण्यासाठी जनजागृतीची गरज आहे.
भयंकर : एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, तीन लहान मुलांचा समावेश
कोरोनाकाळात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…