देश

दिलासादायक : भारतात बनलेली नेजल व्हॅक्सिन लहान मुलांसाठी ठरू शकते गेम चेंजर, WHO चा दावा

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात असतानाच कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी जास्त घातक ठरू शकते असा दावा देखील केला जात आहे. सध्या जगभरात कुठेही 12 वर्षांखालील मुलांना कोरोना लस दिली जात नाही. भारतात अद्याप 18 वर्षांखालील मुलांना देखील लस घेण्यासाठी मंजुरी मिळालेली नाही. मात्र, आता जागतिक आरोग्य संघटनेने एक दिलासादायक माहिती दिली आहे. त्यांच्या मते, कोरोनाची नेजल व्हॅक्सिन (नाकावाटे दिली जाणारी लस) लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते.

नेजल लस ही इतर लशींपेक्षा अधिक फायदेशीर ठरणारी असेल, अशी माहिती समोर आली आहे. शिवाय ही लस घेणं देखील सोपं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) चीफ सायंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांनी याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या की, शालेय शिक्षकांनी व्हॅक्सिन घेणे आवश्यक आहे. जेव्हा मुलांमध्ये कोरोना विषाणू प्रसारित होण्याचा धोका कमी होईल तेव्हाच मुलांना शाळेत पाठवावे. भारतात बनलेली नेजल व्हॅक्सिन लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते. मुलांना ही लस देणे सोपे आहे. शिवाय ही रेस्पिरेटरी ट्र्रॅकमध्ये प्रतिकारशक्ती वाढवेल.’

दरम्यान, NITI आयोगाचे (आरोग्य) सदस्य व्ही के पॉल म्हणाले की, ‘मुलं कोव्हिड संक्रमित असतील तरी बऱ्याचदा कोणतंही लक्षण नसतं किंवा कमीतकमी लक्षणे दिसून येतात. त्यांना सहसा रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसते. परंतु 10-12 वर्षाच्या मुलांवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने नेजल व्हॅक्सिनची चाचणी सुरू केली आहे. या लसीद्वारे नाकातून डोस दिले जातील. हे व्हॅक्सिन नाकावाटे दिलं जाणार आहे. नेजल स्प्रेचे केवळ 4 थेंब पुरेसे असतील. दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन-दोन थेंब टाकले जातील. क्लिनिकल ट्रायल्स रजिस्ट्रीनुसार, 175 जणांना नेजल लस दिली गेली आहे. त्याचे निष्कर्ष येणं अजून बाकी आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago