कोल्हापूर

कोरोनाकाळात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने एक अतिशय कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. ज्या मुलांच्या पालकांचे कोरोनामुळे निधन झाले आहे, अशा मुलांचे पालकत्व कोल्हापूर जिल्हा प्रशासन स्वीकारणार करणार असल्याची माहिती जिल्हयाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. या मुलांची माहिती संकलित करण्याचं काम सुरु असून त्यानंतर काही मुलांना दत्तक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले कि, “कोरोना संसर्गामुळे अनेक कुटूंबातील कर्त्या व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे. आज जवळपास जिल्ह्यातील ४५ मुलांच्या आई वडिलांपैकी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अशा मुलांच्या सामाजिक आणि शैक्षणिक भविष्याचे नुकसान होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांची माहिती संकलनाचे काम सुरू आहे. जिल्ह्यात ४५ मुलांचे आई किंवा वडील नसल्याचे समोर आले आहे. तसेच दोन मुलांचे आई-वडील असे दोन्ही हिरावून घेतल्याचे समोर आले आहे. अशा मुलांची पालनपोषणाची जबाबदारी आता कोल्हापूर जिल्हा प्रशासन घेणार आहे. वेळ पडल्यास त्यांना जिल्हा प्रशासन दत्तक ही घेणार असल्याची तयारी केली जात आहे. त्यांच्या भवितव्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago