क्रीडा

ब्रेकिंग : छत्रसाल स्टेडियम हत्या प्रकरणात कुस्तीपटू सुशील कुमारला अटक

दिल्ली : छत्रसाल स्टेडियममधील ज्युनियर सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या ऑलिम्पिक सुवर्ण पदकविजेता सुशील कुमार याला दिल्ली पोलिसांनी मुंडका परिसरातूनच अटक केली आहे. सुशीलसह त्याचा साथीदार अजय यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सुशीलवर एक लाख रुपये आणि अजयवर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याचवेळी रोहिणी कोर्टाने मंगळवारी सुशीलचा जामीन अर्ज फेटाळला होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मे रोजी छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये कुस्तीपटूंच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली होती. या दरम्यान गोळीबारही झाला. यामध्ये 5 कुस्तीपटू जखमी झाले. त्यात सागर (23), सोनू (37), अमित कुमार (27) आणि इतर 2 कुस्तीपटूंचा समावेश आहे. मात्र, सागरचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तो दिल्ली पोलिसांमधील एका हेड कॉन्स्टेबलचा मुलगा होता. संपत्तीच्या वादातून ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सागर आणि त्याचे मित्र राहत असलेले घर खाली करण्यासाठी सुशील त्यांच्यावर दबाव टाकत होता.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून लोडेड डबल बॅरल बंदूक आणि 3 जिवंत काडतुसे याशिवाय 5 वाहने जप्त केली. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सुशील कुमारची भूमिका तपासली जात आहे, कारण त्याच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी सुशील व इतर आरोपींच्या शोधात अनेक ठिकाणी छापे टाकले. लुकआउट नोटीस बजावल्यानंतरही सुशील या प्रकरणात पोलिसांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आला नाही. त्यामुळे त्याच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. इतकेच नाही तर पोलिसांनी फरार सुशीलच्या अटकेसाठी मदत करणाऱ्यांना 1 लाख रुपयांचे बक्षीस तर त्याचा पीए अजयला अटक करणार्‍यास 50 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. याशिवाय अन्य आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर दुसर्‍याच दिवशी सुशीलने या संदर्भात स्पष्टीकरण दिले होते. तो म्हणाला होता की सागर आमचा सहकारी कुस्तीपटू नाही. आम्हीच पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली होती की काही अज्ञात लोक आमच्या परिसरात येऊन भांडत आहेत. सुशीलने 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक आणि बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलेले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago