देश

ज्याला मृत समजून अंत्यसंस्कार केले, ‘तो’ नऊ दिवसांनी जिवंत परतला, मात्र भूत समजून…

उदयपूर : राजस्थानमध्ये राजसमंद जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. ज्या व्यक्तीला मृत समजून कुटुंबाने त्याचे अंत्यसंस्कार केले, ती व्यक्ती नऊ दिवसांनी जिवंत परतली. आता पोलिस प्रशासन निरुत्तर आहे की ज्याचे अंत्यसंस्कार केले ती व्यक्ती कोण होती? बेवारस मिळालेल्या त्या मृतदेहाचं ना शवविच्छेदन केलं होतं, ना त्याचा व्हिसेरा ठेवला होता.

ही घटना राजसमंद जिल्हा येथील आहे, तिथे गाडोलिया लोहारांची कुटुंबे वर्षानुवर्षे रस्त्यावर राहतात. या वस्तीत औंकारलाल गाडोलिया हे कुटुंबासह राहतात. दहा दिवसांपूर्वी 12 मे रोजी पोलिसांना रस्त्याच्या कडेला एक बेवारस मृतदेह आढळला. या मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तीन दिवसांनंतर औंकारलाल यांचा धाकटा भाऊ नाना लाल यांनी  हा मृतदेह त्याचा मोठा भाऊ औंकारलालचा आहे, असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन न करताच तो मृतदेह नानालाल यांच्याकडे सोपविला. त्यांच्या कुटुंबीयांनी 15 मे रोजी मृतदेहावर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले. औंकारलाल यांच्या तिन्ही मुलांनी मुंडण देखील केले.

अंत्यसंस्कार केल्यानंतर नऊ दिवसांनी औंकारलाल अचानक घरी परतले. त्यांचा धाकटा मुलगा त्यांना भूत समजून घाबरून पळून गेला. मात्र, औंकारलाल यांच्या पत्नीने त्यांना ओळखले आणि आंघोळ करायला सांगून चांगले कपडे दिले. औंकारलालला जिवंत पाहून एकीकडे कुटूंबाला खूप आनंद झाला. तर राजसमंद पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी कुटुंबीयांच्या विनंतीवरून मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले नसल्याचे स्पष्टीकरण दिले. आता केवळ त्या मृतदेहाचा फोटो त्याच्या ओळखीचा आधार आहे. त्याच्यावरूनच तो मृतदेह कोणाचा होता, हे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

औंकारलाल यांनी सांगितले की ते 12 मे रोजी उदयपुर येथे गेले होते. तिथे अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी स्वत: ला महाराणा भुपाल रुग्णालयात दाखल केले होते. जेव्हा ते आजारातून बरे झाले, तेव्हा तेथून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांनी बघितले की त्यांच्या फोटोवर हार लावण्यात आला होता. त्यांच्या तिनही मुलांनी मुंडन केले होते आणि त्यांचा धाकटा मुलगा त्यांना भूत समजून पळून गेला होता.

फुरसुंगी गावातील कॅनॉलमध्ये आढळले दोन मृतदेह

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago