GST Deputy Commissioner Killed in Accident at Mumbai Pune Expressway
पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील कामशेत बोगद्यात भीषण अपघात झाला आहे. इनोव्हा कारचा पुढचा टायर फुटल्यामुळं झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेत जीएसटी डेप्युटी कमिशनर अभिजित घवले यांचा मृत्यू झाला आहे.
हा अपघात आज (२५ मे) सकाळी आठच्या सुमारास झाला. अभिजित घवले त्यांच्या आई-वडिलांना भेटायला चालले होते. मात्र, तिथे पोहोचण्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. अभिजीत घवले (जीएसटी डेप्युटी कमिशनर) यांच्यासह त्यांचे साडू शंकर गोडा यतनाल यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. तर घवले यांच्या पत्नी व चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत घवले त्यांच्या आई-वडिलांना भेटायला त्यांची पत्नी, साडू व चालक यांच्यासह इनोव्हा कारने लातूरला गावी चालले होते. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जात असताना कामशेत बोगद्यात इनोव्हा कारचे समोरील टायर फुटले. त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा कारच्या समोरच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…