देश

संतापजनक! मद्यधुंद कार चालकाची समोर येणाऱ्या प्रत्येकाला धडक, अनेकांना चिरडले, तिघांचा मृत्यू

राजस्थान : एका भरधाव कारने नऊ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तीन जणांना प्राण गमवावे लागले, तर सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास जयपूरच्या परकोटा परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. घटनेच्या वेळी चालक दारुच्या नशेत होता, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात होता, संतापलेल्या जमावाने कारची तोडफोड केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री नाहरगड पोलीस स्टेशनपासून अर्धा किलोमीटर अंतरावर कार चालकाने बेदरकारपणे नऊ जणांना चिरडले. या अपघातात तीन जण मृत्युमुखी पडले, तर सहा जण जखमी झाले आहेत. कार चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्या आणि दुचाकींना, तसेच समोरुन येणाऱ्या पादचाऱ्यांना धडक दिली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. अपघातानंतर कार चालक गाडी सोडून पळून गेला. घटनास्थळी अनेकजण जमा झाले. जमावाने कारची तोडफोड केली. जमाव आक्रमक झाल्यामुळे आसपासच्या पोलीस स्टेशनमधून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. डीसीपी राशी डोगरा डुडी यांनी सांगितले की, कार चालक उस्मान खान (वय ५५, रा. शास्त्री नगर) याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर जमाव शांत झाला. आरोपी चालक उस्मान खान याची विश्वकर्मा येथे लोखंडाची फॅक्टरी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, चालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कार चालकाने नाहरगड पोलीस स्टेशनच्या चौकात सर्वात आधी एका स्कूटरला आणि एका पादचाऱ्याला धडक दिली. त्यानंतर कार संतोषी माता मंदिराच्या दिशेने वेगाने नेली. तिथे त्याने एका बाईकला आणि एका पादचाऱ्याला धडक दिली. यानंतर, थोड्याच अंतरावर एका व्यक्तीला धडक मारली आणि त्यानंतर तो कार सोडून पळून गेला. अपघातामध्ये एक बाईक कारच्या समोर अडकली. चालकाने बाईक अडकलेली असतानाही कार चालवत नेली. त्यामुळे रस्त्यावर ठिणग्या पडू लागल्या होत्या. कारने चिरडल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.

नाहरगड पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी सांगितले की, “मोठा आवाज ऐकून आम्ही बाहेर धावलो, तोपर्यंत कार चालकाने एका स्कूटरला धडक मारली होती आणि एका पादचाऱ्याला चिरडले होते. तो वेगाने कार चालवत होता आणि समोर येणाऱ्या प्रत्येकाला धडक मारत होता. जखमींना तात्काळ गणगौरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून चार जणांना एसएमएस रुग्णालयात रेफर करण्यात आले.”

या अपघातात अवधेश पारीक (वय 35) आणि ममता कंवर (वय 50), वीरेंद्र सिंह (वय 45, ममता यांचे भाऊ) यांचा मृत्यू झाला. तर, मोनेश सोनी (वय 28), दीपिका सोनी (वय 17), मोहम्मद जलालुद्दीन (वय 44), विजय नारायण (वय 65), जेबुनिशा (वय 50) आणि अंशिका (वय 24) हे जखमी झाले आहेत. अपघातात 2 लहान मुलेही जखमी झाली आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

3 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

3 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

3 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

3 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 महिना ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 महिना ago