नाशिक

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रंभाबाई आनंदा काळे (वय ६०) असे मृत महिलेचे नाव असून त्या निफाड येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या.

रंभाबाई काळे या निफाडमधील मामलेदार चौक परिसरात वास्तव्यास होत्या. त्या अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा भाचा प्रवीण घायाळ यांनी २४ फेब्रुवारी रोजी निफाड पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचा वापर करत रंभाबाई यांच्या मोबाईलचा सीडीआर (Call Detail Record) तपासला. त्यामध्ये काही संशयास्पद क्रमांक समोर आल्यानंतर पोलिसांनी निफाड येथील अरुण बाजीराव ढेपले (वय ४०) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीदरम्यान अरुण ढेपले याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याला सोडून देण्यात आले. मात्र, प्रकरण गंभीर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीने निफाडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

उपचारादरम्यान अरुण ढेपले याने पोलिसांसमोर धक्कादायक कबुली दिली. त्याने रंभाबाई काळे यांचा खून करून निफाडजवळील जुना देवपूर रस्त्यालगत असलेल्या विहिरीत मृतदेह फेकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी शोधमोहीम राबवली असता विहिरीत महिलेचा मृतदेह आढळून आला.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अरुण ढेपले हा दूध विक्रीचा व्यवसाय करतो. दूध देण्याच्या निमित्ताने त्याची आणि रंभाबाई काळे यांची ओळख झाली होती. पुढे दोघांमध्ये पैशांच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाला. या वादातूनच त्याने रंभाबाई यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून या प्रकरणाचा अधिक तपास निफाड पोलीस करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago