मुंबई

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा नवरा आकाश मौर्य याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली. बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या सागरवर चाकूने वार करण्यात आले. गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मुंबईतील विलेपार्ले परिसरात ही घटना घडली. जखमी सागरला तत्काळ व्ही. एन. देसाई हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरची बहीण ममता हिचा विवाह २०२१ साली आकाश मौर्यसोबत झाला होता. आकाशला दारूचे व्यसन होते. रविवारी रात्री घरी आल्यानंतर त्याने जेवणाबाबत वाद घालत पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. बहिणीला होणारी मारहाण पाहून सागरने त्यात हस्तक्षेप केला. मात्र, यामुळे संतापलेल्या आकाशने त्याच्यावर हल्ला चढवला. दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. त्याच वेळी आकाशने घरातील चाकू उचलून सागरच्या मानेवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात सागर कोसळला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.

गंभीर अवस्थेत सागरला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

विमानतळ पोलीस ठाणे यांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपीचा शोध सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

कौटुंबिक वाद आणि मद्यपानाच्या व्यसनामुळे होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांनी कडक कारवाईची मागणी केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago