10 year old girl raped and murdered in Thane
ठाणे : १० वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची भयंकर समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे ही घटना घडली आहे. या नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला इमारतीतून खाली फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नराधमाने चिमुकलीला खेळणी देण्याचं आमिष दाखवत घरात नेलं. त्यानंतर तिच्यावर अतिप्रसंग केला. नराधमाने लैंगिक अत्याचार केल्यानंतर चिमुकलीला इमारतीच्या डक्टमध्ये खाली फेकून दिले. मुंब्र्यातील ठाकूरपाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान, या चिमुकलीचा मृतदेह आढळल्यानंतर आजू-बाजूच्या लोकांनी तात्काळ त्याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरु केला.
पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि १२ तासाच्या आत पोलीस नराधमापर्यंत पोहोचले. आरोपी आसिफ अकबर मंसूरी (वय 20) याला अटक करण्यात आली आहे. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…