ग्लोबल

थरकाप! १३ वर्षीय मुलीची ११४ वेळा भोसकून निर्घृण हत्या

फ्लोरिडा : एका १४ वर्षाच्या मुलाने १३ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मुलीला तब्बल ११४ वेळा भोसकण्यात आले होते. मृत मुलीचे नाव बेली असून फ्लोरिडा पूर्वेकडील जंगलात या मुलीचा मृतदेह आढळला होता. आरोपी मुलाचे नाव एडन फूसी आहे. एडन फूसी आणि बेली हे दोघे एकाच वर्गात शिकत होते. बेलीच्या अंगावरील 114 पैकी 49 जखमा तिच्या हातांवर आणि डोक्यावर आहेत, ती स्वतःचा बचाव करत असताना त्या झाल्या असाव्यात.

सेंट जॉन्स काउंटी स्टेट ऍटर्नी कार्यालयाने ग्रँड ज्यूरींच्या माध्यमातून फूसीला हत्या प्रकरणातील आरोपी ठरवले आहे. ही केस बाल न्यायालयातून प्रौढांच्या न्यायालयात हलवण्यासाठी अर्ज देण्यात आला आहे. एडन या प्रकरणात दोषी आढळला तर त्याला आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. फूसीने आपण हत्या करण्यासाठी योजना आखली असल्याचे त्याच्या मित्रांना सांगितले होते. मात्र, कोणाची हत्या करणार हे सांगितले नव्हते, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्याचे ऍटर्नी आर.जे. लारिजा यांनी सांगितले की, फूसीचे कृत्य अतिशय घृणास्पद आहे. त्यामुळेच त्याचा खटला बाल न्यायालयातून वर्ग करण्यासाठी अर्ज देण्यात आला आहे.

९ मे रोजी जॅक्सन विलेमधील डर्बिन क्रॉसिंग समुदायाच्या सामुदायिक केंद्रात बेली शेवटची दिसली होती. सेंट जॉन्स काउंट शेरिफ कार्यालयाने सांगितले की, बेलीच्या आई वडिलांनी सकाळी ती बेपत्ता झाली असल्याची माहिती दिली. त्यानंतर शेजारच्या जंगलात तिचा मृतदेह आढळला होता. तपास अहवालात म्हटले आहे की, मुलीचा मृतदेह तिच्या घराजवळच आढळला. तर, तिथे जवळच तलावाजवळ चाकू आढळला. हा धारदार चाकू आरोपीचा असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. फूसीच्या घरात रक्ताचे डाग असलेले कपडे आढळले. सीसीटीव्ही फूटेजमध्येही आरोपी फूसीसोबत बेली दिसली होती.

पुण्यात तरुणावर दिवसाढवळ्या चाकूहल्ला, कारण…

‘स्कूल ऑफ रॉक’ फेम अभिनेता केव्हिन क्लार्कचे अपघातात निधन, हॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago