महाराष्ट्र

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी जबरदस्ती शारीरिक संबंध, तरुणीची पहाटेच पोलीस ठाण्यात धाव…

रायगड : लग्नाचे खोटे आश्वासन देऊन १८ वर्षे ७ महिन्यांच्या तरुणीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार अलिबाग तालुक्यात समोर आला आहे. पीडित तरुणीने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत आरोपी नितेश पाटील उर्फ पप्प्या, रा. खंडाळे, याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे होते आणि काही काळ त्यांच्यात प्रेमसंबंध होते. या नात्याचा फायदा घेत आरोपीने तरुणीचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर आरोपीने तिला मौजे गोंधळपाडा येथील एका लॉजवर नेले आणि तरुणी विरोध करत असतानाही तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटना कधी घडली?
ही घटना डिसेंबर २०२५मध्ये घडली असल्याचे पीडितेने नमूद केले आहे. मात्र नेमका दिवस व वेळ आठवत नसल्याचे तीने स्पष्ट केले आहे. घटनेनंतर जेव्हा तिने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा आरोपीने सरळ नकार देत तिची फसवणूक केल्याचे उघड झाले.

१४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ४.१७ वाजता अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०७/२०२६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल (पेण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून तपासिक अधिकारी सरिता मुसळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आरोपीचा गुन्हेगारी इतिहास
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पाटील याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे नोंद आहेत. २०१५ मध्ये महिलेशी छेडछाड तसेच घरात घुसखोरीचे गुन्हे; तर २०२३ मध्ये मारहाण, धमकी आणि नुकसानप्रकरणी गुन्हे नोंदवले गेले होते. त्यामुळे या प्रकरणाने प्रेमसंबंधांच्या आडून होणाऱ्या फसवणूक व अत्याचाराच्या घटनांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पोलीस प्रशासनाने पीडित तरुणीला आवश्यक ते संरक्षण दिले असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. घटनेच्या पुढील तपासावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago