The young man killed in pune
पुणे : बहिणीला ‘प्रपोज’ करणाऱ्या तरुणाला तिच्या भावाने समजावून सांगितले, मात्र, त्यामुळे राग आल्याने त्या तरुणाने तरुणीच्या भावावर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोंढवा पोलिस ठाण्यापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर दिवसाढवळ्या ही घटना घडली आहे. हा प्रकार कोंढवा खुर्द येथील शितल पेट्रोल पंप चौकात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या बहिणीला सात ते आठ महिन्यांपूर्वी रस्त्यात अडवून ‘प्रपोज’ केले होते. तेव्हा तरुणीचा भाऊ या आरोपीला भेटला होता आणि त्याला ‘माझ्या बहिणीला त्रास देऊ नको’ असे सांगितले होते. या गोष्टीचा राग आरोपीच्या मनात होता. त्यातूनच आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली आणि त्यानंतर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यावरून अस्लम शेख (रा. येवलेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…