पुणे

भाजपच्या नगरसेवकाला जमिन विक्री प्रकरणात अटक

पुणे : पिंपरी पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपच्या नगरसेवकाला अटक केली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची जागा बनावट कागदपत्रे, संमतीपत्र, ताबा पावती, साठेखत बनवून परस्पर विकून १५ लाख ८० हजार रुपये उकळणाऱ्या महापालिकेतील नगरसेवक राजेंद्र लांडगे यांच्यासह दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

नगरसेवक राजेंद्र किसन लांडगे (वय ४२) यांच्यासह मनोज महेंद्र शर्मा (वय ३८) याला अटक केली आहे. तर, रविकांत सुरेंद्र ठाकूर (वय ४०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता एस. एस. भुजबळ यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मूळ मालक नसताना लांडगे यांनी परस्पर बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी रविकांत ठाकूरचा शोध घेत आहेत. राजेंद्र लांडगे प्रथमच पालिकेवर निवडून आले असून, त्यांनी शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago