Akshaya tritiya things you must know before buying gold coins
पुणे : अनेकांना सोन्यात गुंतवणूक करायला आवडते आणि दिवाळी, धनत्रयोदशी आणि अक्षय्य तृतीया यांसारख्या प्रसंगी तर ते आवर्जून खरेदी करतात. यावर्षी अक्षय्य तृतीया 3 मे रोजी आहे आणि बरेच लोक सोने खरेदी करण्याचा विचार करत असतील. वास्तविक, अक्षय्य तृतीया हा सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो. या प्रसंगी सोने खरेदी करणे सौभाग्य आणि समृद्धीशी संबंधित असते, असे मानतात.
तथापि, जर तुम्ही या निमित्ताने सोन्याची नाणी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घेऊन हे पाऊल उचलले पाहिजे, कारण पुरेशी माहिती नसल्यास आपण सोने खरेदी करण्यात अपयशी ठरू शकतात आणि नुकसान होऊ शकते. म्हणूनच आज आपण सोन्याचे नाणे खरेदी करताना लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी बघणार आहोत.
सोन्याची शुद्धता
सोन्याची शुद्धता ही एक अशी गोष्ट आहे, जी सोन्याची नाणी किती चांगली आहेत, हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. शुद्धता कॅरेटने मोजली जाते. जर तुमचे सोन्याचे नाणे 24 कॅरेटचे असेल, तर याचा अर्थ नाण्याचे 24 पैकी 24 भाग सोन्याचे आहेत. 22 कॅरेट सोन्याच्या नाण्यांमधील 24 पैकी 22 भाग सोन्याचे आहेत, तर उर्वरित दोन भाग इतर कोणत्यातरी धातूचे आहेत.
हॉलमार्क
हॉलमार्किंग भारतीय मानक वैशिष्ट्यांनुसार सोन्याच्या नाण्याची शुद्धता सुनिश्चित करते. सोन्याच्या वस्तूंची शुद्धता आणि सूक्ष्मता निश्चित करण्यासाठी बीआयएस (ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स) हॉलमार्किंग सेंटरमध्ये त्यांची चाचणी करून प्रमाणित केले जाते. सोन्याची नाणी विकत घेण्यापूर्वी हॉलमार्किंगचे चिन्ह नक्कीच तपासा.
वजन
सोन्याचे नाणे विकत घेण्यापूर्वी, त्याचे वजन विचारात घ्या. तुम्ही उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायांमधून निवडू शकता, सर्वात सामान्य 1 ग्रॅम, 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅम नाणी आहेत. सोन्याची नाणी 0.5 ग्रॅम ते 50 ग्रॅमच्या श्रेणीत येतात.
मेकिंग चार्ज
तुम्ही हे देखील लक्षात घेतले पाहिजे की दागिन्यांच्या तुलनेत सोन्याची नाणी खरेदी करणे तुलनेने सोपे आहे. कारण नाण्यांच्या स्वरूपात तुम्ही कमीत कमी मेकिंग चार्जेससह किमान 0.5 ग्रॅम सोने खरेदी करू शकता. कारण सोन्याची नाणी बनवण्यासाठी कमी कारागिरी लागते.
पुनर्विक्री
आरबीआयच्या आदेशानुसार, जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही बँकेकडून सोन्याची नाणी खरेदी केली, तर ती बँकेला विकता येणार नाही. ज्यांना त्यांची सोन्याची नाणी विकायची आहेत, त्यांना त्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म किंवा मान्यताप्राप्त ज्वेलर्स शोधावे लागतील.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…