महाराष्ट्र

राज्यात किमान 25 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू, सहा वर्षांतील सर्वाधिक आकडेवारी

मुंबई : महाराष्ट्रात 2022 मध्ये आतापर्यंत किमान 25 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे, जो सहा वर्षांतील सर्वाधिक असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. याआधी 2016 मध्ये उष्माघाताने 19 जणांचा मृत्यू झाला होता.

1 मे 2022 पर्यंत उष्माघाताची एकूण 381 प्रकरणे आरोग्य विभागाकडे नोंदवण्यात आली आहेत. उष्माघातामुळे सर्वाधिक 11 मृत्यू नागपुरात, त्याखालोखाल औरंगाबादमध्ये 5 आणि नाशिकमध्ये 4 मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. नागपूर विभागात राज्यातील सर्वाधिक ३०० प्रकरणे आहेत.

दरम्यान, राज्याच्या काही भागात पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या उत्तर मध्य महाराष्ट्रातील भागात ४ मे ते ६ मे दरम्यान उष्णतेची लाट जाणवेल. तर कोकण आणि गोवा परिसर, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती दिसणार नाही. तथापि, मराठवाड्यात उष्णतेची लाट येणार नसली तरी या प्रदेशातील कमाल तापमान जास्त म्हणजेच ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहील. उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचे कारण म्हणजे वायव्य भारतातून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या लाटा आहेत.

वायव्य आणि मध्य भारतात पारा उच्च आणि सरासरी कमाल तापमान अनुक्रमे 35.9 आणि 37.78 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने काही आठवड्यांपासून देशातील अनेक भाग तीव्र उष्णतेच्या लाटेत त्रस्त आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

17 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago