महाराष्ट्र

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी वाचवले अपघातग्रस्त तरुणाचे प्राण..

परळी : बीड येथील शासकीय बैठका आटोपून परत परळीला येत असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज रस्त्यात अपघातग्रस्त झालेल्या एका तरुणाचे प्राण वाचवण्यास मदत केली आहे. बीड वरून परळी कडे जात असताना सिरसाळा ते पांगरी दरम्यान एक तरुण दुचाकीस्वार अपघात ग्रस्त होऊन रस्त्यावर अक्षरश: रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, हे दृश्य पाहताच धनंजय मुंडे यांनी आपला ताफा तात्काळ थांबवून अपघात ग्रस्त तरुणाच्या दिशेने धाव घेतली.

धनंजय मुंडे यांनी त्या तरुणाचा हात पकडून तो शुद्धीत असल्याची खात्री केली, आपले नाव महेश असल्याचे सांगत त्या तरुणाने तो पांगरी इथला असल्याचे सांगितले. त्या तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम झालेली होती ते पाहून धनंजय मुंडे यांनी तात्काळ आपल्या स्वीय सहाय्यकांना, पोलीस व रुग्णवाहिका बोलावण्यासाठी फोन लावायला लावला, धनंजय मुंडे यांनी स्वतः बोलल्यानंतर अगदी दोनच मिनिटात रुग्णवाहिका घटनास्थळी हजर झाली; धनंजय मुंडे यांनी सदर तरुणाला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याचा सूचना दिल्या तसेच रुग्णालय प्रशासनाला देखील याबाबत दक्षता घेण्याबाबत धनंजय मुंडे यांनी सूचना दिल्या.

सदर तरुणास अंबाजोगाई कडे रवाना केल्यानंतर घटनेची माहिती अपघात ग्रस्त तरुणाच्या कुटुंबास मिळाली, त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता, धनंजय मुंडे यांची रस्त्यात भेट झाली, तेव्हा ताई तुम्ही काळजी करू नका, सावकाश अंबाजोगाईला जा, तो बरा आहे, शुद्धीवर आहे, बोलतोय, रुग्णालयात देखील मी बोललो आहे, अशी माहिती देऊन त्यांना धीर दिला, तसेच त्यांनाही अंबाजोगाई ला जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago