देश

EMI होणार स्वस्त! RBI ने रेपो दरात केली २५ बेसिस पॉइंट्सची कपात

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आपल्या पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत करत रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात जाहीर केली आहे. यानुसार रेपो दर ५.५०% वरून ५.२५% वर आला असून ही कपात तात्काळ लागू करण्यात आली आहे. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की या निर्णयामुळे गृहकर्जाच्या EMIमध्ये घट होईल आणि बँकांना कमी दराने कर्ज वितरीत करता येईल.

गव्हर्नर मल्होत्रा यांनी पुढे सांगितले की, गेल्या महिन्यातील आव्हानात्मक परिस्थितीनंतरही आगामी महिने GDP आणि महागाईच्या दृष्टीने सकारात्मक असतील. संपूर्ण वर्षासाठी महागाईचा अंदाज २% असा आहे. दुसऱ्या तिमाहीत वास्तविक GDP वाढ ८.२% नोंदली गेली असून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत GDP वाढ ८% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मौद्रिक धोरण समितीने (MPC) रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सने कपात करण्याचा निर्णय एकमताने मंजूर केला. अन्य दरांमध्ये बदल करण्यात आलेले नाहीत—CRR ३% वर, SDF दर ५.२५% वर, तर MSF आणि बँक दर ५.७५% वर कायम ठेवण्यात आले आहेत. तसेच, RBI ने ₹१ लाख कोटींच्या ओएमओ खरेदीसह ५ अब्ज डॉलर्सच्या ३ वर्षांच्या डॉलर/रुपया नुतनीकरण स्वॅपची घोषणा केली आहे. दोन्ही उपाययोजना डिसेंबरमध्ये राबविण्यात येणार आहेत.

२०२५ मध्ये RBI ने सलग चौथ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये प्रत्येकी २५ बेसिस पॉइंट्स, जूनमध्ये ५० बेसिस पॉइंट्स आणि आता पुन्हा २५ बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली आहे. या वर्षी एकूण १२५ बेसिस पॉइंट्स किंवा १.२५% इतकी घट झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला दोन बैठकीत रेपो दर स्थिर ठेवण्यात आला होता; परंतु आता तो ६.५०% वरून ५.२५% वर आला आहे.

रेपो दरातील कपातीसोबतच शेअर बाजारातही तेजी दिसून आली. सेन्सेक्स २०० पेक्षा जास्त अंकांनी वाढून ८५,५०० च्या वर पोहोचला, तर निफ्टी ७५ अंकांच्या वाढीसह २६,११० वर व्यवहार करत आहे. निफ्टी बँक निर्देशांकातही ३६४ अंकांची जोरदार वाढ नोंदली गेली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago