अर्थकारण

१ ऑगस्टपासून होणार ‘हे’ ६ आर्थिक बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम

नवी दिल्ली : ऑगस्ट २०२५ मध्ये देशात काही महत्त्वाचे आर्थिक बदल होणार आहेत. क्रेडिट कार्डच्या अटींपासून ते यूपीआयच्या नियमांपर्यंत, एलपीजी आणि एटीएफ दरांपासून ते बँक सुट्ट्यांपर्यंत – हे बदल थेट सामान्य नागरिकाच्या रोजच्या खर्चावर परिणाम करू शकतात. अशाच ६ बदलांची सविस्तर माहिती घेऊयात.

१. एसबीआय को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवरील विमा कव्हर बंद
जर तुम्ही एसबीआय को-ब्रँडेड क्रेडिट कार्डधारक असाल, तर ११ ऑगस्ट २०२५ पासून तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. एसबीआय युको बँक, सेंट्रल बँक, पीएसबी, करूर वैश्य बँक आणि अलाहाबाद बँक यांसारख्या संस्थांच्या एलिट आणि प्राइम कार्डधारकांना मिळणारे मोफत हवाई अपघात विमा कव्हर (₹५० लाख ते ₹१ कोटी पर्यंत) बंद करण्यात येणार आहे.

२. एलपीजीच्या किमतीत संभाव्य बदल
प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला एलपीजी किंवा कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत बदल होतो. जुलै २०२५ मध्ये कमर्शियल सिलेंडर ₹६० ने स्वस्त झाला होता. यानंतर १ ऑगस्टपासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात अपेक्षित आहे. हे बदल महागाईशी थेट संबंधित असल्याने घरगुती बजेटवर परिणाम करू शकतात.

३. यूपीआय व्यवहारांवर मर्यादा लागू
एनपीसीआय (राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने १ ऑगस्टपासून यूपीआय व्यवहारांमध्ये मर्यादा घालण्याचा निर्णय घेतला आहे. या मर्यादांचा उद्देश सर्व्हरवरील लोड कमी करणे आणि सेवा अधिक स्थिर ठेवणे आहे.

नवीन नियम पुढीलप्रमाणे:

  • दिवसातून फक्त ५० वेळा बॅलन्स चेक करता येणार.
  • २५ वेळा बँक खाते तपासणी करता येणार.
  • ऑटोपे व्यवहार (जसे नेटफ्लिक्स, म्युच्युअल फंड हप्ते) तीन विशिष्ट स्लॉटमध्येच प्रोसेस होतील – सकाळी १० पूर्वी, दुपारी १ ते संध्याकाळी ५, आणि रात्री ९:३० नंतर.
  • दिवसातून फक्त ३ वेळा अयशस्वी व्यवहारांची स्थिती तपासू शकता आणि प्रत्येक वेळेस ९० सेकंदांचे अंतर अनिवार्य असेल.

४. सीएनजी आणि पीएनजीच्या दरात संभाव्य बदल
सीएनजी व पीएनजीच्या किमती दर महिन्याला बदलण्याची परंपरा असली, तरी एप्रिल २०२५ पासून त्यात बदल झाला नव्हता. मागील बदल ९ एप्रिल रोजी झाला होता. सध्या मुंबईत सीएनजी ₹७९.५०/किलो व पीएनजी ₹४९/युनिट आहे. १ ऑगस्टपासून नवीन दर लागू होण्याची शक्यता असून, हे दर बदल ग्राहकांच्या वाहतूक व स्वयंपाकाच्या खर्चावर थेट परिणाम करू शकतात.

५. बँक सुट्ट्यांचा परिणाम व्यवहारांवर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला बँक सुट्ट्यांची यादी जाहीर करते. ऑगस्ट महिन्यातही काही सण, प्रादेशिक सुट्ट्या व आठवड्याचे शेवटचे दिवस यामुळे बँका ठरावीक दिवशी बंद राहतील. त्यामुळे तुमचे व्यवहार, चेक क्लिअरिंग आणि बँकिंग सेवा यावर परिणाम होऊ शकतो. सुट्ट्यांची यादी राज्यानुसार वेगळी असते.

६. एटीएफ (एअर टर्बाइन फ्युएल) दरात बदल
एलपीजीप्रमाणेच, एअर टर्बाइन फ्युएलच्या (ATF) किमती देखील महिन्याच्या १ तारखेला बदलतात. एटीएफचे दर फ्लाइट तिकिटांच्या किमतींवर थेट परिणाम करतात. त्यामुळे १ ऑगस्टपासून हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी तिकिटांच्या किमतीत वाढ किंवा कपात होण्याची शक्यता आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago