अर्थकारण

Budget 2026 मध्ये मोठा ट्विस्ट! काय होणार स्वस्त, काय महागणार जाणून घ्या..?

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर केला. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा त्यांचा सलग नववा अर्थसंकल्प असून, यामध्ये कररचना आणि सीमाशुल्क धोरणात महत्त्वाचे बदल जाहीर करण्यात आले.

काय जाहीर करण्यात आलं?
अर्थसंकल्पीय भाषणात सीतारमण यांनी स्पष्ट केले की, देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि निर्यात वाढवण्यासाठी अनेक वस्तूंवरील सीमाशुल्क (Customs Duty) कमी करण्यात येत आहे. याचा थेट फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे.

कुठल्या वस्तू स्वस्त होणार?

सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार खालील वस्तूंवर सीमाशुल्क कपात किंवा पूर्ण सूट देण्यात आली आहे —

  • कपडे आणि कापड उत्पादने
  • चामड्याच्या वस्तू व चामड्याचे उत्पादन
  • सिंथेटिक पादत्राणे
  • कर्करोग व मधुमेहावरील 17 जीवनावश्यक औषधे (पूर्ण शुल्कमुक्त)
  • लिथियम-आयन सेल्स
  • मोबाईल फोन बॅटरी
  • सोलर ग्लास
  • मिश्र गॅस (CNG)
  • इलेक्ट्रिक वाहने (EV)
  • मायक्रोवेव्ह ओव्हन
  • विमान इंधन
  • परदेश प्रवासाशी संबंधित खर्च
  • याशिवाय, संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या काही आयात वस्तूंवरील मूलभूत सीमाशुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.

कुठे महागाई वाढणार?

ज्या क्षेत्रांमध्ये देशांतर्गत उत्पादनाला प्राधान्य देण्याचा उद्देश आहे, त्या ठिकाणी सरकारने सीमाशुल्क वाढवले आहे. त्यामुळे पुढील वस्तू महाग होण्याची शक्यता आहे —

  • दारू
  • भंगार (Scrap)
  • काही खनिजे

सरकारचा उद्देश काय?

या निर्णयामागील मुख्य हेतू म्हणजे —

  • Make in India उपक्रमाला बळकटी
  • आयात खर्च कमी करणे
  • आरोग्य, ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात स्वस्त पर्याय उपलब्ध करून देणे
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago