छत्रपती संभाजी नगर

प्रियकराकडून होणाऱ्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून १९ वर्षीय तरुणीची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर : भीमनगर येथील १९ वर्षीय प्रारंभी दीपक इंगळे या तरुणीने तिच्या प्रियकराकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १९ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास तिने आपल्या राहत्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. छावणी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सचिन राजू भिसे (वय १९, रा. मिल कॉर्नर) याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रारंभी हिने नुकताच ‘ऑपरेशन टेक्निशियन’चा कोर्स पूर्ण केला होता आणि ती शहरातील एका खाजगी रुग्णालयात काम करत होती. याच रुग्णालयात सचिन वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत होता. दोघांमध्ये जानेवारी २०२५ मध्ये ओळख झाली आणि त्याचे रूपांतर लवकरच प्रेमसंबंधात झाले. त्यांनी लग्न करण्याचाही विचार केला होता. मात्र प्रारंभीच्या वडिलांनी या नात्याला विरोध केला आणि तिला सचिनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. परंतु प्रारंभीने संबंध तोडल्यावरही सचिन तिला आणि तिच्या आईला त्रास देत राहिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो वारंवार आर्थिक मदतीची मागणी करत असे. एकदा प्रारंभीच्या आईने त्याला मोटारसायकलसाठी ₹३,००० रुपये दिल्याचेही निष्पन्न झाले आहे.

आत्महत्येपूर्वीचे क्षण
१९ जुलै रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास प्रारंभी आणि तिची आई काही कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. काही वेळातच त्या परत आल्या. प्रारंभीने त्यानंतर स्वतःला खोलीत बंद करून घेतले आणि बराच वेळ फोनवर बोलत होती. कुटुंबीयांनी आवाज दिल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खोलीचे दार उघडून पाहिले असता ती छताच्या हुकाला लटकलेल्या अवस्थेत आढळली.

मोबाईलवरील चॅट्स आणि ब्लॅकमेलिंगचे पुरावे
प्रारंभीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने मोबाईल तपासला असता, सचिनचे सलग ५-६ मिस्ड कॉल्स आणि स्नॅपचॅटवरील चॅट्स आढळले. त्या चॅट्समध्ये प्रारंभीने सचिनला तिची खासगी माहिती कुणाशीही शेअर करू नये, अशी विनंती केल्याचे दिसून आले. हे स्पष्ट संकेत आहेत की आरोपी तिच्या खासगी गोष्टींचा गैरफायदा घेत तिला ब्लॅकमेल करत होता.

प्रारंभीच्या आईने पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, सचिनने तिच्या मुलीवर मानसिक दबाव टाकला, तिला धमकावले, आणि तिच्या आयुष्यात हस्तक्षेप केला. या आरोपांच्या पुष्टीसाठी चॅट्सचे स्क्रीनशॉटही पोलिसांना सादर करण्यात आले आहेत.

आरोपी सचिन भिसे हा फक्त अकरावीपर्यंत शिकलेला असून, त्याचे आईवडील त्याच्या लहानपणीच वारले आहेत. तो आपल्या भावासोबत राहत होता. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २७ जुलै २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीविरुद्ध ब्लॅकमेलिंगचा तपास सुरू असून, मोबाईलमधील डिजिटल पुराव्यांची बारकाईने तपासणी केली जात आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago