क्राईम

महिलेने पतीची हत्या करून मृतदेह किचनमध्ये पुरला, स्वतःच्या लहान मुलीसमोर केलं भयंकर कृत्य…

मुंबई : मुंबईत एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महिलेने हत्या केल्यानंतर पतीचा मृतदेह किचनमध्येच पुरला होता. महिलेने हे भयंकर कृत्य तिच्या सहा वर्षाच्या मुलीच्या डोळ्यांसमोर केलं होतं. हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव रईस शेख आहे. पोलिसांनी हत्येप्रकरणी शाहिदा शेख आणि तिचा प्रियकर अनिकेत उर्फ अमित मिश्रा याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रईस शेख आणि शाहिदा शेख हे दांपत्य मूळचे उत्तर प्रदेशचे असून नोकरीच्या शोधात मुंबईत आले होते. त्यांना सहा वर्षाची मुलगी आणि दोन वर्षांचा मुलगा आहे. २५ मे रोजी शाहिदा शेख यांनी दहिसर पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. २१ मे रोजी पती घऱाबाहेर पडले आणि त्यानंतर पुन्हा घऱी परतले नसल्याचं आणि त्याच्याशी संपर्क होत नसल्याचं तिने सांगितलं होतं. त्यानुसार पोलिसांनी तक्रार दाखल करत तपास सुरु केला. मात्र, २५ मे रोजी रईसचा भाऊ अनीस मुंबईत आला आणि दहिसर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन शाहिदा वेगवेगळी माहिती देत असून ती काहीतरी लपवत असल्याची शंका व्यक्त केली.

हृदयद्रावक : चिमुकलीचा कारमध्ये गुदमरून मृत्यू, वडिलांनी दुसऱ्या दिवशी गाडीचा दरवाजा उघडला आणि…

१ जूनला पोलीस रईसच्या घरी गेले. घराची झडती घेतली असता पोलिसांना किचनमधील टाइल्स योग्य पद्धतीने लावलेल्या नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी शाहिदाची कठोरपणे चौकशी केली आणि तिने हत्या करून मृतदेह किचनमध्ये पुरल्याची कबुली दिली. पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली असता तिने जे काही पाहिलं होतं ते सर्व पोलिसांना सांगितलं. जर पोलिसांना सांगितलं तर तुलादेखील अशीच पुरुन टाकेन अशी धमकी आईने दिल्याचंही मुलीने सांगितलं. रईस शेखच्या हत्येनंतर ११ दिवसांनी मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. किचनमध्ये तीन फूट खट्टा खोदून पुरण्यात आलेला हा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीस जवळपास १२ तास खोदकाम केलं.

शाहिदाने शेजारी राहणाऱ्या अमित मिश्रासोबत विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिली. पती रईसला या संबंधांबद्दल समजले होते आणि त्याने हे सर्व थांबवण्यास सांगितलं होतं. २२ मे रोजी शाहिदाने अमित मिश्रासोबत मुलीच्या डोळ्यांदेखत रईसची वायरीने गळा दाबून हत्या केली. यानंतर त्यांनी मृतदेहाचे तीन तुकडे केले. थोडा वेळ मृतदेह बाथरुममध्ये ठेवला आणि त्यानंतर त्यांनी तो किचनमध्ये खड्डा खोदून तिथेच पुरला होता.

अनैतिक संबंधांचा अर्थ महिला चांगली आई नाही, असा लावला जाऊ नये – उच्च न्यायालय

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago