mumbai mayor kishori pednekar explaination controversial tweet
मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर एका ट्विटमुळे वादात अडकल्या आहेत. ट्विटरवर लसींच्या ग्लोबल टेंडरसंबंधी प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्याचा बाप काढल्याने किशोरी पेडणेकर सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. मात्र आता या संपूर्ण वादावर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, ते ट्विट मी नाही तर एका शिवसैनिकाने केलं होतं. या शिवसैनिकाची हकालपट्टी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं की, “बीकेसीत मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी माझ्यासोबत शाखाप्रमुख आणि दोन कार्यकर्ते होते. कार्यक्रम सुरु असताना मी मोबाइल माझ्याकडे ठेवत नाही. तसंच माझ्या मोबाइलला लॉक नसतो. मोबाइल पाहत असताना शिवसैनिकाने हे ट्विट केलं होतं. ते ट्विट पाहिल्यानंतर ही मोठी चूक झाल्याचं माझ्या लक्षात आलं. आपल्याशी कोणी कितीही वाईट वागलं तरी आपण तसं वागू नये, या मताची मी आहे. मी कधीही गैरवर्तन करत नाही. मी तात्काळ ते ट्विट डिलीट केलं. तसंच त्या मुलाला परत माझ्याकडे यायचं नाही असं सांगितलं.” असं स्पष्टीकरण किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.
किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या कि, “आता तर मला चांगला धडा मिळाला. कोणी कितीही जवळचा असला तरी त्याच्याकडे मोबाइल देऊ नये हा धडाच यानिमित्ताने मिळाला आहे. आज ट्विट केलं आहे, उद्या काहीही होऊ शकतं.”
काय आहे प्रकरण?
किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ही मुलाखत त्यांनी ट्विटरवर शेअर केली होती. या मुलाखतीत त्यांनी एक कोटी लोकांना लस देण्यासंदर्भात पालिकेकडून काढण्यात आलेल्या ग्लोबल टेंडर तसंच त्याला कंपन्यांनी दिलेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला होता. या ट्विटवर एका व्यक्तीने कंत्राट कोणाला दिले? असा प्रश्न विचारला होता. यावर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना ‘तुझ्या बापाला’ असं म्हटलं होतं. हे ट्विट व्हायरल होऊ लागल्यानंतर महापौर पेडणेकर सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्या, त्यानंतर महापौरांनी हे ट्विट डिलीट केलं होतं.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…