देश

हृदयद्रावक : चिमुकलीचा कारमध्ये गुदमरून मृत्यू, वडिलांनी दुसऱ्या दिवशी गाडीचा दरवाजा उघडला आणि…

उत्तर प्रदेश : कानपूरमधील कन्नोज येथे सोमवारी एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. विजय कुमार यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा कारमध्ये अडकल्यामुळे गुदमरून मृत्यू झाला. ही मुलगी कारमध्ये खेळायला गेली होती, परंतु, सेंटर लॉक सिस्टीममुळे तिला कारचा दरवाजा उघडता न आल्यामुळे ती आतमध्येच अडकून पडली. तिने रडून रडून आई-वडिलांना आवाज देण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणालाही तिचा आवाज ऐकू आला नाही. त्यामुळे, गुदमरून या चिमुकलीचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, तेराजाकेट परिसरातील सुलतानपूर गावात राहणारा विजय कुमार यांचा भाऊ मनोज सोमवारी दुपारी आपली कार घेऊन विजय कुमार यांच्या घरी आला. त्याचवेळी विजय यांची पाच वर्षांची मुलगी शुची गाडीच्या आत खेळायला गेली. त्यानंतर मनोज घराच्या आत निघून गेला. परंतु, सेंटर लॉक सिस्टीममुळे कारचे दरवाजे आपोआप बंद झाले. त्यानंतर शुची कोठेही आढळली नाही, त्यामुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी संपूर्ण गावात तिचा शोध घेतला, परंतु शुची सापडली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांना फोन करून मुलगी हरवल्याचे सांगितले. एसआय प्रदीप कुमार यांनी हरवलेल्या व्यक्तीची नोंद करून शोध सुरु केला.

अनैतिक संबंधांचा अर्थ महिला चांगली आई नाही, असा लावला जाऊ नये – उच्च न्यायालय

रात्री या गाडीवर कव्हर टाकून ती झाकून ठेवण्यात आली. परंतु, शुचीला कोणीही पाहिले नाही. मंगळवारी सकाळी विजय कुमार आणि मनोज यांनी कोतवालीला जाण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. तेव्हा शुची समोरच्या सीटवर मृतावस्थेत आढळली. ते दृश्य पाहून शुचीचे वडिल जोरात किंचाळले आणि रडू लागले. वडिलांनी शुचीचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago