देश

संतापजनक : मुलीच्या घशात अडकले होते लिचीचे बी, डॉक्टर म्हणाले, कोरोना रिपोर्ट आणा, पण तोपर्यंत…

बिहार : डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्यामुळे एका ८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या मुलीच्या घशात लिचीचे बी अडकले होते, त्यामुळे मुलीचे वडील तात्काळ तिला घेऊन रुग्णालयात आले. परंतु, डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका रुग्णालयात ही घटना घडली आहे. मृत मुलीचे वडिल म्हणाले की, डॉक्टरांनी बराच वेळ मुलीवर उपचार केला नाही, त्यामुळे मुलीने आपला जीव गमावला.

कुढणी भागातील रघुनाथपूर मधुबन गावात राहणाऱ्या मुलीच्या घशामध्ये लिचीची बी अडकली, त्यामुळे मुलीचे वडील संजय राम यांनी तिला तात्काळ कुढणी पीएससी येथे नेले, तेथे सदर रुग्णालय रेफर करण्यात आले. त्यामुळे तिचे वडील तिला घेऊन सदर रुग्णालयात पोहोचले. परंतु, येथे डॉक्टरांनी काहीही ऐकून न घेता मुलीची कोरोना चाचणी करण्यास सांगितले. मुलीच्या असाहाय्य  वडिलांनी तिची कोरोना टेस्टदेखील करुन घेतली. परंतु, त्यानंतर देखील मुलीचा कोरोना रिपोर्ट येईपर्यंत डॉक्टर तिच्यावर उपचार करण्यासाठी तयार नव्हते.

दरम्यान, दुर्लक्ष व उपचाराअभावी त्यांची मुलगी राधा कुमारी हीच मृत्यू झाला. आपत्कालीन परिस्थितीत ऑन ड्युटी डॉक्टर येईपर्यंत या निरागस मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सिव्हिल सर्जन डॉ. एस.के. चौधरी यांनी अशा प्रकारे डॉक्टरांनी केलेले दुर्लक्ष गंभीर असल्याचे सांगत चौकशी व कारवाईची गरज असल्याचे म्हटले आहे.

हृदयद्रावक : चिमुकलीचा कारमध्ये गुदमरून मृत्यू, वडिलांनी दुसऱ्या दिवशी गाडीचा दरवाजा उघडला आणि…

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago