क्राईम

मुलाने केली वडिलांची त्रिशुळाने भोकसून हत्या, कारण…

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील औरैया येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेयसीशी बोलण्यास नकार दिल्यामुळे एका मुलाने आपल्या वडिलांची हत्या केली. वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा फरार झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, औरैयाच्या अजितमल येथील भिखेपूर येथे अरविंद कुमार आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांना 10 मुले आणि 1 मुलगी आहे. त्यांचा मोठा मुलगा आणि मोठी मुलगी विवाहित आहेत. त्यांचा पाचव्या नंबरचा मुलगा शिवम याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. परंतु, या प्रेमप्रकरणाला शिवमच्या वडिलांचा विरोध होता. वडील शिवमला प्रेयसीशी बोलण्यास वारंवार नकार द्यायचे. त्यामुळे या दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे. याचाच राग मनात ठेवून शिवमने झोपलेल्या वडिलांचा त्रिशुळाने भोकसून खून केला.

मृत अरविंद यांचा मुलगा प्रदीप याने सांगितले की त्यांच्या वडिलांनी शिवमला प्रेयसीशी बोलण्यास सक्त मनाई केली होती. त्यामुळे शिवम खूप संतापलेला होता. शिवम सोमवारी संध्याकाळी रागातच घराबाहेर निघून गेला होता. त्यानंतर रात्री उशिरा तो घरी परतला. त्यावेळी त्याने हातात जवळच्या मंदिरातील त्रिशुळ आणले होते. त्यानंतर त्याने झोपलेल्या वडिलांना त्रिशुळाने भोकसले. वडिलांनी आरडाओरडा केला असता सर्वजण काय झाले ते बघण्यासाठी त्यांच्याकडे गेले, तेव्हा ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांनी वडिलांना तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले, परंतु तोपर्यंत त्यांचे बरेच रक्त वाहून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आरोपी शिवम याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिस हवालदार महिलेने केला सासूला पेटवण्याचा प्रयत्न

रेल्वे स्थानकावर बेशुद्ध पडली महिला, 2 वर्षांच्या चिमुकलीने प्रसंगावधान दाखवत वाचवले आईचे प्राण

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago