देश

रेल्वे स्थानकावर बेशुद्ध पडली महिला, 2 वर्षांच्या चिमुकलीने प्रसंगावधान दाखवत वाचवले आईचे प्राण

उत्तर प्रदेश : दोन वर्षांच्या मुलीने रेल्वे स्थानकावर बेशुद्ध झालेल्या आपल्या आईला मदत करण्यासाठी मोठे प्रसंगावधान दाखवले. या चिमुकलीला अद्याप नीट बोलता देखील येत नाही. पण तरीही या चिमुकलीने आईची मदत केली. ही मुलगी काही अंतरावर उभ्या असलेल्या एका आरपीएफच्या लेडी कॉन्स्टेबलकडे गेली आणि तिचे बोट धरून तिला आपल्या आईकडे घेऊन आली. या महिलेबरोबर 6 महिन्यांचे बाळही होते. महिला बेशुद्ध असल्याचे पाहताच लेडी कॉन्स्टेबलने तात्काळ इतर पोलिसांच्या मदतीने महिलेला रुग्णालयात दाखल केले.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद रेल्वे स्टेशनवर एक महिला बेशुद्ध पडली. या महिलेबरोबर तिची दोन वर्षाची मुलगी आणि एक 6 महिन्यांचे बाळही होते. आई उठत नसल्यामुळे सुरुवातीला ही चिमुकली घाबरली आणि रडायला लागली. परंतु, काही वेळाने तिने काही अंतरावर उभ्या असलेल्या एका आरपीएफच्या लेडी कॉन्स्टेबलला बघितले. त्यानंतर तिने धावत जाऊन या लेडी कॉन्स्टेबलचे बोट पकडले. अगोदर या लेडी कॉन्स्टेबलला काहीच समजले नाही. पण त्यानंतर ही मुलगी तिला एका बाजूला घेऊन जाऊ लागली, तेव्हा लेडी कॉन्स्टेबल देखील तिच्यामागे गेली. ही मुलगी महिला कॉन्स्टेबलला तिच्या आईकडे घेऊन गेली.

प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर महिलेला बेशुद्ध अवस्थेत पाहून महिला कॉन्स्टेबल अस्वस्थ झाली. या महिलेच्या जवळ ६ महिन्यांचे बाळही होते. लेडी कॉन्स्टेबलने जीआरपीला बोलावले. जीआरपीने तात्काळ रुग्णवाहिकेला कॉल केला आणि या महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ही घटना आठ वाजता घडली. पायऱ्यांजवळ महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. बाल संरक्षण दलाला घटनेची माहिती देण्यात आली आहे. सध्या जीआरपी मुलांची काळजी घेत आहे. डॉक्टरांनी सांगितले की आता ही महिला सुरक्षित आहे. तिच्या जीवाला कोणताही धोका नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago