33 crore 50 lakh sanctioned for tourism development of Mahabaleshwar
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. त्यांनी यावेळी स्वप्नील लोणकरची आत्महत्या अत्यंत वेदनादायी घटना असल्याचं म्हटलं. तसेच राज्यात यापुढे अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील आश्वासन दिल आहे.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका सर्वांनाच बसला. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. लोणकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्यात यापुढे अशी घटना घडणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊ. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येवरुन विरोधकांनी अधिवेशनात राज्य सरकारवर टीका केली. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी ही घोषणा केली.
अजित पवार पुढे म्हणाले की, “काल कॅबिनेटमध्ये एमपीएससीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. एसईबीसी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एमपीएससीची प्रक्रिया थांबवावी लागली. आता येत्या 31 जुलैपर्यंत राज्यात एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरण्यात येतील, त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. एमपीएससी ही संस्था स्वायत्त असल्याने त्यामध्ये जास्त हस्तक्षेप करता येत नाही असं सांगत अजित पवार म्हणाले की, सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर आम्ही या विषयावर आज पुन्हा चर्चा करणार आहोत.
स्वप्नील लोणकर या तरुणाची आत्महत्या
एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या स्वप्नील लोणकर या तरुणाने ‘MPSC हे मायाजाल आहे’ असं सुसाईड नोटमध्ये लिहीत पुण्यात आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमधे आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने आत्महत्या करत असल्याच स्पष्ट केलं. स्वप्नील 2019 आणि 2020 मधे झालेली एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला होता. पण पुढे या परीक्षांचाच भाग असलेली तोंडी परीक्षा दीड वर्ष झालीच नाही. त्यामुळे तो नैराश्यात होता, त्यातून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…