क्राईम

अल्पवयीन मुलाचे धक्कादायक कृत्य, अगोदर 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार मग साक्षीदाराचा खून…

नवी दिल्ली : १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या धक्कादायक कृत्याने देशाची राजधानी दिल्लीत खळबळ उडाली आहे. पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या या अल्पवयीन मुलाने गुरुवारी या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या १२ वर्षीय मुलाचा गळा दाबून खून केला. आरोपी मार्चमध्ये बालसुधारगृहातून बाहेर आला होता आणि तेव्हापासून तो सतत अल्पवयीन मुलाला धमकावत होता.

पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी संध्याकाळी सावदा रेल्वे लाईनजवळ अल्पवयीन आरोपीने त्याच्या मित्रासह १२ वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना मुलाचा गळा ब्लेडने चिरल्याचे आढळून आले. यासोबतच त्यांच्या डोक्यावरही विटेने वार केलेले होते. पोलिसांनी अल्पवयीन आरोपी व त्याच्या साथीदारालाही अटक केली आहे. पोलीस चौकशीत असे समोर आले की आरोपी अल्पवयीन मुलावर 2019 मध्ये पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात 12 वर्षांच्या मुलाने साक्ष दिली होती. हा आरोपी बालसुधारगृहातून सुटल्यावर त्याने साक्षीदार मुलाला धमकावणे सुरू केले. त्यातच गुरुवारी संधी पाहून त्याने बदला घेण्यासाठी या मुलाची हत्या केली.

एवढेच नाही, तर हत्येनंतर आरोपी मृत मुलाच्या घरी पोहोचला आणि त्याने मृत मुलाच्या भावाला हत्येची माहिती दिली, जेणेकरून त्याची दहशत कायम राहील आणि कोणीही त्याच्याविरुद्ध साक्ष देणार नाही. मात्र, लोकांनी तात्काळ आरोपीला पकडून पोलिसांना माहिती दिली.

शाळकरी मुलीचा पाठलाग करत ‘आय लव्ह यू’ म्हटल्याबद्दल तरुणाला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

पुणे : 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न, मैत्रिणीने प्रसंगावधान दाखवल्याने मुलीची सुटका…

या संपूर्ण घटनेमुळे कायद्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, ज्यात अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवले जाते आणि तो बाहेर येऊन असे गुन्हे करतो.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago