court order
मुंबई : पॉक्सो कायद्यांतर्गत नियुक्त विशेष न्यायालयाने एका शाळकरी मुलीचा पाठलाग केल्याबद्दल आणि तिला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याबद्दल ३० वर्षीय तरुणाला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश जयश्री आर. पुलाटे यांनी तरुणावर 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की या गुन्ह्यात जास्तीत जास्त तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे, मात्र तो नेहमीचा गुन्हेगार नसल्यामुळे त्याला एक वर्षाची शिक्षा होऊ शकते. ही घटना 2015 मध्ये घडली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईने टिळक नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
काय आहे प्रकरण?
2015 मध्ये ही घटना घडली तेव्हा अल्पवयीन मुलगी इयत्ता 7 वी मध्ये शिकत होती. कोर्टासमोर जबाब देताना मुलीने सांगितले होते की, हा तरुण 17 एप्रिल २०१५ पूर्वी 15 दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता. त्याने तिचे नाव विचारले होते आणि तिला ‘आय लव्ह यू’ म्हणाला होता. तिने त्यावेळी काहीही प्रतिसाद दिला नाही. परंतु, दुसर्या दिवशी जेव्हा त्याने पुन्हा तिच्याशी संपर्क साधला, तेव्हा तिने त्याला एक पत्र दिले होते, ज्यात असे लिहिले होते की जर त्याने हे वागणे चालू ठेवले तर ती तिच्या पालकांकडे तक्रार करेल. त्यावर तो ‘सॉरी’ म्हणत निघून गेला.
तथापि, 17 एप्रिल 2015 रोजी, तिने सांगितले की जेव्हा ती घरी जात होती तेव्हा त्याने तिला रोखले होते. तिने आरडाओरडा केला आणि काही अंतर पुढे चालत असलेली तिची आई जवळ आली. त्यानंतर तिने तरुणाकडे बोट दाखवून तिच्या आईला सर्व हकीकत सांगितली, त्यावेळी तो तरुण पळून गेला. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली.
पीडितेने तरुणाशी बोलण्यात अनास्था दाखवली होती आणि तरीही आरोपी सतत तिचा पाठलाग करत होता, असे पुरावे रेकॉर्डवर असल्याचे न्यायाधीश पुलाटे यांनी आदेशात म्हटले आहे. तिच्या साक्षीवरून असे दिसून येते की, त्याचे पाठलाग करणे मुलीला आवडत नव्हते. ती तिच्या पालकांना सांगेल असे तिने सांगितले होते, परंतु आरोपीने तिचा पाठलाग सुरूच ठेवला, असे आदेशात म्हटले आहे. परंतु, हा नेहमीचा गुन्हेगार नसल्यामुळे न्यायालयाने त्याला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…