strict action against those who transport and sell gutka
पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) हडपसर पोलिसांच्या मदतीने एका ट्रकमधून हैदराबादहून मुंबईकडे नेला जाणारा 52 लाख 18 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वास डगळे यांनी याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. हा ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे. श्रीराम यादव (52) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. त्याचे साथीदार सिडलेदत्त रेड्डी, विष्णू रेड्डी, सुशांत रे आणि दीपक कोठारी यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिल सदाशिवराव गवते यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
बुधवार २९ जून रोजी गुटख्याने भरलेला ट्रक मुंबईच्या दिशेने निघाला होता. याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली, त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिसांच्या मदतीने हा ट्रक हडपसर येथे अडवला. ट्रकमध्ये 40 पोत्यांमध्ये 52 लाख 18 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला, आणि पोलिसांनी तो जप्त केला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…