Chief Minister Eknath Shinde
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘शिवसेना नेते’ पदावरून हटवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी मागे घेतला नाही, तर ते या निर्णयाला कायदेशीर आव्हान देतील, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी शनिवारी सांगितले.
शिवसेनेचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी शिंदे यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करत ‘शिवसेना नेते’ पदावरून हटवले. शिंदे यांनी पक्षाचे सदस्यत्व “स्वेच्छेने” सोडले होते, त्यामुळे “शिवसेना पक्षाध्यक्ष या नात्याने माझ्याकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून मी तुम्हाला पक्ष संघटनेतील शिवसेना नेतेपदावरून हटवतो” असे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी गोव्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ठाकरे यांनी निर्णय मागे घेतला नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल. “सर्व निवडून आलेल्या आमदारांनी शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या विधानसभेच्या गटनेतेपदावरून हटवण्यालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आम्ही ठाकरे यांना कायदेशीर उत्तर देऊ.” ते पुढे म्हणाले की, शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून आता विधानसभेचे नेते आहेत. “उद्धव ठाकरेंच्या कोणत्याही वक्तव्याला आम्ही प्रतिसाद देणार नाही, असे आम्ही ठरवले आहे. ते आमचे नेते आहेत आणि आम्ही त्यांचा आदर करतो.”
दरम्यान, रविवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सहभागी होण्यासाठी शिंदे गट शनिवारी रात्री मुंबईत परतण्याची शक्यता आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…