Two bodies were found in a canal in Fursungi village
चेन्नई : तामिळनाडूमध्ये एका 15 वर्षीय मुलीचा गर्भपाताची गोळी खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील चेंगमजवळ ही घटना घडली. मुलीला गर्भवती करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. एस मुरुगन असे या व्यक्तीचे नाव असून तो 27 वर्षांचा आहे. तो मुलीचा नातेवाईक होता. ती एका सरकारी शाळेत दहावीची विद्यार्थिनी होती आणि मुरुगन ड्रायव्हर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी सुमारे एक वर्षापूर्वी गरोदर राहिली होती, तेव्हा दुसऱ्या महिन्यात गर्भपाताच्या गोळ्या घेऊन तिने गर्भ संपवला होता. तथापि, तिने तिची दुसरी गर्भधारणा संपवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र तिचा मृत्यू झाला. यावेळी ती चार महिन्यांची गरोदर होती.
वृत्तानुसार, हा माणूस दररोज मुलीला शाळेत सोडत असे आणि यादरम्यान दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. मुलगी गरोदर राहिल्यानंतर मुरुगनने त्याचा मित्र सी प्रभू याच्या मदतीने एका वृद्ध महिलेकडून गर्भपाताची गोळी घेतली. मुलीने तिची दुसरी गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर जेव्हा मुरुगन मुलीला शाळेत सोडण्यासाठी घरातून घेऊन गेला, तेव्हा वाटेत त्याने तिला गर्भपाताची गोळी दिली. तिने गोळी घेतल्यानंतर दोघे शाळेकडे जाऊ लागले, तेव्हा ही मुलगी अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. त्यानंतर मुरुगन याने मुलीला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले.
मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तिरुवन्नमलाई येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी मुरुगनला प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पोक्सो) कायदा आणि आयपीसीच्या आरोपाखाली अटक केली. मुरुगनला गर्भपात करण्यात मदत केल्याबद्दल प्रभू यालाही अटक करण्यात आली. आरोपी मुरुगन आणि प्रभू यांना वेल्लोर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.
पोलीस तपासात गोळ्या देणाऱ्या वृद्ध महिलेची ओळख पटली असून ती 65 वर्षांची आहे आणि योग्य शैक्षणिक पात्रतेशिवाय रूग्णांना औषधे लिहून देते..या वृद्ध महिलेला अटक करण्यात आली नाही कारण ती आजारी होती, असे पोलिसांनी सांगितले.
अल्पवयीन मुलाचे धक्कादायक कृत्य, अगोदर 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार मग साक्षीदाराचा खून…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…