राजकारण

यापूर्वी असे कधीही पहिले नाही, पवारांनी लगावला राज्यपाल कोश्यारींना टोला…

मुंबई : शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता सर्वच आमदारांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. शपथविधीनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. तसेच दोन्ही नेत्यांना पेढाही भरवला. या पेढा भरवतानाचे त्यांचे फोटो व्हायरल झाले. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदे आपल्या बंडखोर आमदारांसह आज मुंबईत पोहोचले. यावेळी, त्यांच्या बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तत्पूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी 8 वाजता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राज्यपालांनी पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरवूनही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आता, शरद पवार यांनी राज्यपालांच्या या कृतीबद्दल टीका केली आहे.

शरद पवार म्हटले कि, जवळपास 1990 सालापर्यंत मी वेगवेगळ्या पदावर शपथा घेतल्या आहेत. पण आजपर्यंत मला कुठल्याही राज्यपालांनी पेढा भरवला नाही. यापूर्वी ज्यांनी शपथ घेतली, त्यांना फुलांचा गुच्छही देताना मी पाहिलं नाही. यावेळी त्यांनी दिला याचा आनंद आहे. राज्यपालांनी गुणात्मक बदल केलाय, असे म्हणत पवारांनी राज्यपालांना टोला लगावला. दरम्यान सभागृहात गेल्यानंतर बंडखोर आमदारांचं मतपरिवर्तन होईल, असा काहींना विश्वास आहे असे म्हणत शरद पवारांनी बहुमत चाचणीबाबत सूचक विधान केलं आहे. तर आम्ही बहुमत सहजच सिद्ध करू असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago