अहिल्यानगर

कै. विनायक शिवराम आव्हाड गुरुजी यांच्या स्मरणार्थ शिबलापूर येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप

संगमनेर : कै. विनायक शिवराम आव्हाड गुरुजी यांच्या स्मरणार्थ आज (2 जुलै) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिबलापुर येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या, पेन, पेन्सिल आणि इतर शालोपयोगी स्टेशनरी साहित्य वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या अनुषंगाने हे साहित्य वाटण्यात आले. सर्वच विद्यार्थ्यांना एकसमान व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी या साहित्याची मोठी मदत होईल. या उपक्रमातून आव्हाड कुटुंबियांकडून एक आदर्श ठेवण्यात आला आहे.

यावेळी शिबलापुर गावचे माजी सरपंच दिलावर शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बोंद्रे, युवक कार्यकर्ते राजेंद्र सुखदेव नागरे, ज्ञानदेव गंगाराम नागरे, विश्वास मुन्तोडे, दिपक नागरे, शिवाजी आनंदा नागरे (से.नि. सहाय्यक फौजदार), भिमराज सांगळे (स्था. स्कूल कमिटी अध्यक्ष), राहुल मुन्तोडे, आव्हाड कुटुंबियांच्या वतीने निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक विनायक आव्हाड, शिवाजी विनायक आव्हाड (सेवानिवृत्त आदर्श शिक्षक), भाग्यश्री आव्हाड, सिद्धार्थ आव्हाड, अक्षय आव्हाड, संदीप पाटील (औरंगाबाद), तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भुसाळ मॅडम, वाकचौरे सर, मुठे सर, पिचड सर, नागरे मॅडम आदी. उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बोंद्रे यांनी यावेळी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आव्हाड कुटुंबियांचे आभार मानण्यात आले.

शिक्षण हे वाघिणीचे दूध असते, हे आव्हाड गुरुजींनी नेहमी विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज उच्चपदांवर कार्यरत आहेत. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या गुरुजींचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या निधनानंतर रोजंदारी करून दोन भावांचा सांभाळ केला. स्वतःचे आणि भावांचे शिक्षण पूर्ण केले आणि भावाला पोलीस सेवेत रुजू केले. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण शिक्षित असून गुरुजींच्या पावलावर पाऊल ठेवून समाजोपयोगी कामे करत आहेत. -दिलावर शेख (माजी सरपंच, शिबलापूर)

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago