Categories: इतर

…म्हणूनच ED कडून अटक होण्याची भीती माझ्या मनात आहे – एकनाथ खडसे

मुंबई : ED ने एकदा चौकशी केल्यानंतर पुन्हा समन्स बजावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रिट याचिका करून ED च्या कार्यवाहीला आव्हान दिले. याविषयी मुंबई उच्च न्यायालयात न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी पुढील सुनावणी झाली. यावेळी पुण्यातील भोसरीमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अचानक ED ने चौकशी सुरू केली. म्हणूनच ED कडून चौकशीच्या नावाखाली अटक होण्याची माझ्या मनात भीती आहे,’ असं खडसे यांच्यातर्फे सांगण्यात आला.

‘भोसरीमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणात २०१६ मध्ये एफआयआर दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी याबाबत तपास पूर्ण करून २०१८ मध्ये या आरोपांत तथ्य नसल्याचे म्हणत क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला होता. तोपर्यंत इडीचा या प्रकरणात हस्तक्षेप नव्हता. मात्र, मी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे ठरवल्यानंतर अचानक या प्रकरणात ED चा प्रवेश झाला. म्हणूनच ED कडून चौकशीच्या नावाखाली अटक होण्याची भीती माझ्या मनात आहे, असं खडसेंकडून सांगण्यात आलं.

पीएमएलए कायद्यातील तरतुदींप्रमाणे चौकशीत सहकार्य न केल्यास अटक करण्याची तरतूद आहे. तसेच आर्थिक स्वरूपाचा गुन्हा असल्याने भारतीय दंड संहितेच्या कलम ४३८ अन्वये अटकपूर्व जामीन मिळवण्यातही अडसर आहे. इडीच्या समन्सविरोधात अपिल करण्याचाही पर्याय नाही. म्हणून याचिकेद्वारे संरक्षण मिळण्यासाठी विनंती केली आहे’, असा युक्तिवाद खडसे यांनी अॅड. आबाद पोंडा यांच्यामार्फत मांडला. वेळेअभावी खंडपीठाने पुढील सुनावणी सोमवारी (१५ मार्च) ठेवली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago