देश

मोठी बातमी : सबमरीन INS करंज नेव्हीमध्ये सामील, शत्रूच्या प्रदेशात असूनही लागणार नाही सुगावा

स्कॉर्पिअन क्लास मधील सबमरीन (पाणबुडी) INS करंज आज (१० मार्च) भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड मध्ये एका कार्यक्रमादरम्यान INS करंजला सामील करण्यात आले. नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंह आणि ऍडमिरल (निवृत्त) व्ही.एस. शेखावत हेदेखील यावेळी उपस्थित होते. मेक इन इंडिया मोहिमेचे हे एक अतिशय मोठे यश मानले जात आहे. या सबमरीनचे वैशिष्ट्य म्हणजे ही सबमरीन मिशन दरम्यान शत्रूच्या प्रदेशात असली तरीदेखील शत्रूला याचा सुगावा लागणार नाही.

INS करंजची वैशिष्ट्ये :

  1. INS करंजची लांबी सुमारे 70 मी. आणि उंची 12 मी. आहे. तिचे वजन सुमारे 1600 टन आहे.
  2. ही सबमरीन क्षेपणास्त्र आणि टॉर्पेडोने सुसज्ज आहे. या सबमरीनमध्ये समुद्राच्या आतच माईन्स पसरवून शत्रूला उध्वस्त करण्याची क्षमता आहे.
  3. या सबमरीनचे खास वैशिष्ट्य हे आहे की ती आवाज न करता शत्रूचे नुकसान करू शकते. तसेच रडाराच्या देखील पकडीत येत नाही, त्यामुळे शत्रूला या सबमरीनचा सुगावा देखील लागत नाही.
  4. ही सबमरीन दीर्घकाळ पाण्याखाली राहून भारतीय नौदलाला समुद्रात मजबूत स्थिती देईल.
  5. INS करंज ही एक डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. या सबमरीनला समुद्राखाली शोधणे अवघड आहे.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

1 आठवडा ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

1 आठवडा ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

1 आठवडा ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

1 आठवडा ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

4 आठवडे ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

4 आठवडे ago