देश

ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरून ‘ब्लू टीक’ हटवली

नवी दिल्ली : ट्विटरने भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टीक (निळ्या रंगाचं चिन्ह) हटवली आहे. यामुळे लोकांनी या कंपनीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, भारताच्या उपराष्ट्रपतींच्या अधिकृत हॅन्डल (@VPSecretariat) वर मात्र ही ब्लू टीक कायम आहे.

ट्विटरच्या पॉलिसीनुसार, ब्लू व्हेरीफाईड बॅच इतर ट्विटरकर्त्यांना हे सांगण्यासाठी मदत करतो की, संबंधीत ट्विटर हॅन्डल खात्रीशीर, उल्लेखनीय आणि सक्रिय आहे. ट्विटरकडून अशा ब्लू टीक सरकारी कंपन्या, ब्रॅन्ड, गैर सरकारी संघटना, वृत्त संस्था, पत्रकार, राजकीय – मनोरंजन – खेळ – गेमिंग क्षेत्राशी निगडीत व्यक्ती तसंच इतर प्रभावशाली व्यक्तींच्या ट्विटर हॅन्डलला देण्यात येतात.

ट्विटरच्या अटींनुसार, वापरकर्त्याने त्याच्या हँडलचे नाव बदलल्यास किंवा एखादे खाते निष्क्रिय किंवा अपूर्ण असल्यास किंवा वापरकर्त्याने ज्या नावाने सुरुवातीला आपले खाते तयार केले, त्या काळात सत्यापित केले, परंतु बर्‍याच दिवसानंतरही ते खाते निष्क्रिय असेल, तर ट्विटर कोणत्याही वेळी आणि कोणत्याही सूचनेशिवाय किंवा नोटिशीशिवाय ट्विटर हॅन्डलवरून ब्लू टीक आणि व्हेरिफाईड स्टेटस काढू शकते.

भाजप प्रवक्ते सूरज नाखुआ म्हणाले कि, “ट्विटरने भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टीक का काढली? हा भारतीय राज्यघटनेवर एक प्रकारचा हल्ला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago