Prime Minister reviews progress of India’s vaccination drive
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना लसीकरण मोहीमेचा शुक्रवारी आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान मोदींनी लसीच्या अपव्ययाबद्दल चिंता व्यक्त केली. यावेळी लस उत्पादनासाठी कंपन्यांना करण्यात येणाऱ्या मदतीच्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली. लस उत्पादन कंपन्यांना युनिट्स वाढवण्यासह आर्थिक पाठबळ आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी सरकार मदत करत आहे.
पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांमधील लसीच्या अपव्ययाचा आढावा घेतला. राज्यांमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण अजूनही खूप आहे अशी चिंता व्यक्त करत ते कमी करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज असल्याचं असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. लसींची उपलब्धता आणि त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठीच्या ‘रोडमॅप’ची माहिती अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली. लसींच्या उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी वेगवगेळ्या लस उत्पादकांना मदत करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली. भारत सरकार लस उत्पादनासाठी कंपन्यांना आणखी प्लांट उभारण्यासाठी मदत करत आहे, कच्च्या मालाचा पुरवठा तसेच आर्थिक पाठबळ देत आहे.
देशातील ४५ वर्षांवरील आणि १८ ते ४४ वर्षांदरम्यानचे नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना देण्यात येत असलेल्या लसीकरणाचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. लसीकरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली.
या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल, माहीत आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…