Naagin 3 actor Pearl V Puri arrested under POCSO for allegedly raping minor girl
मुंबई : मालाडमधील मालवणी पोलिसांनी नागीण 3 फेम टीव्ही अभिनेता पर्ल व्ही पुरी याच्यासह पाच जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पर्लसह सहा आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. या प्रकरणात पीडितेने पोलिसांकडे जबाब नोंदवला असून पॉक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलीने सांगितले की, आधी तिच्यावर कारमध्ये बलात्कार करण्यात आला. त्यानंतर पुन्हा तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले. पर्लसह अन्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. सर्व आरोपींविरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना 4 जून रोजी रात्री अटक केली. आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नागीन ३ व्यतिरिक्त पर्लने दिल की नजर से खूबसूरत, फिर भी ना माने बदतमीज दिल, मेरी सासू मां, नागार्जुन एक योद्धा, बेपनाह प्यार आणि ब्रह्मराक्षस 2 मध्ये भूमिका निभावल्या आहेत. तो बिग बॉस 12 आणि 13 मध्ये गेस्ट म्हणून दिसला होता. याशिवाय, पर्ल किचन चॅम्पियन 5 आणि खतरा खतरा खतरा या रिअॅलिटी शोमध्ये देखील दिसला होता.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…