The navies of India and Sri Lanka will conduct three consecutive days of War practice
भारत आणि श्रीलंकेचे नौदल आज (१९ ऑक्टोबर) पासून सलग तीन दिवस २१ ऑक्टोबरपर्यंत युद्धसराव करणार आहे. हा सराव त्रिंकोमालीजवळ हिंद महासागरात होणार आहे. वर्षातून एकदा युद्धसराव करण्यासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात एक करार झाला आहे. या करारानुसार आठव्यांदा भारतीय नौदल आणि श्रीलंकेचे नौदल स्लिनेक्स युद्धाभ्यास करणार आहे. दोन्ही देशांचे नौदल उच्च दर्जाचा समन्वय राखण्यासाठी सराव करणार आहे. यात अनेक गुंतागुंतीच्या कवायती केल्या जातील.
पाणबुडी विरोधी लष्करी कारवायांसाठी तयार केलेल्या आयएनएस कामोर्ता आणि आयएनएस किल्टन या युद्धनौका भारताकडून सरावात सहभागी होतील. तसेच सरावामध्ये आधुनिक हलक्या वजनाचे ध्रुव हेलिकॉप्टर, चेतक हेलिकॉप्टर आणि डॉर्निअर विमान सहभागी होणार आहे. भारतीय नौदलाने श्रीलंकेच्या नौदलाला विकलेली सागरी गस्ती नौका एसएलएनएस सयुरा आणि श्रीलंकेत नौदल प्रशिक्षणासाठी वापरली जात असलेली एसएलएनएस गजबाहु या दोन नौका श्रीलंकेकडून युद्धसरावात सहभागी होतील. गजबाहु आधी कॅनडाच्या नौदलात कार्यरत होती. एचएमसीएस हॅलोवेल या नावाने दुसऱ्या महायुद्धात कार्यरत असलेली ही नौका नंतर कॅनडाने इस्रायलला दिली. इस्रायलने आयएनएस मिझांक नावाने ही नौका काही काळ वापरली. नंतर इस्रायलने ही नौका १९५८ मध्ये श्रीलंकेला विकली.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…