क्रीडा

चेन्नई सुपरकिंग्स संघाला धक्का, ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे खेळू शकणार नाही पुढील काही मॅच

चेन्नई सुपरकिंग्स संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याला दुखापत झाली आहे. त्यामुळे आयपीएलच्या पुढील मॅच ब्राव्हो खेळणार नाही, अशी शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये ब्राव्होच्या कंबरेजवळच्या पायाला नियंत्रित करणाऱ्या स्नायूंना दुखापत झाली. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. दुखापतीचे स्वरुप लक्षात येताच ब्राव्होला विश्रांती घेऊन उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला.

ब्राव्होला स्नायूंच्या दुखापतीमुळे खेळण्यासाठी वेगाने पायाच्या हालचाली करताना प्रचंड त्रास होत आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये तीन ओव्हर टाकणाऱ्या ब्राव्होला दुखापतीचा त्रास होऊ लागल्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. नंतर मॅच संपेपर्यंत तो परतला नाही. दिल्ली कॅपिटल्सने पाच विकेट राखून मॅच जिंकली.

दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे ड्वेन ब्राव्हो आयपीएलमध्ये किमान पुढील काही मॅच खेळणार नाही, असे चेन्नई सुपरकिंग्स संघाचे मुख्य कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले. तसेच वैद्यकीय पथक ब्राव्होच्या दुखापतीवर उपचार करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचे आकस्मिक निधन, चाहत्यांमध्ये शोककळा

मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…

15 तास ago

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…

15 तास ago

तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…

15 तास ago

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

2 दिवस ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

4 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

1 महिना ago