Private training aircraft crashes in Gujarat's Amreli, pilot dies
गुजरात : अमरेली शहरातील शास्त्री नगर भागात मंगळवारी एक खाजगी प्रशिक्षण विमान कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातात विमान चालवत असलेल्या पायलट अनिकेत महाजन यांचा मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त विमान हे ‘व्हिजन फ्लाइंग इन्स्टिट्यूट’ या प्रशिक्षण संस्थेचे होते. अपघातानंतर विमानात जोरदार स्फोट झाला, ज्यामुळे आसपासच्या रहिवाशांमध्ये घबराट पसरली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसर सील करून बचाव कार्य सुरु करण्यात आले. याबाबत अधिक माहिती देताना अमरेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) चिराग देसाई यांनी सांगितले, “दुर्दैवाने पायलट अनिकेत महाजन यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. घटनेचा तपास सुरू आहे.”
मागील एका महिन्यात गुजरातमध्ये घडलेली हहे दुसरी प्रशिक्षण विमान दुर्घटना आहे. मार्च महिन्यात मेहसाणा जिल्ह्यातील एका गावाजवळसुद्धा अशाच प्रकारचा अपघात झाला होता. विमान प्रशिक्षण संस्थांमध्ये वाढत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर, या दुर्घटनांबाबत नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA) गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…