देश

क्रूरतेचा कळस! दोन महिलांनी कुत्र्याला स्कूटरला बांधून फरफटत नेलं, उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू

पंजाब : दोन महिलांनी कुत्र्याला निर्दयी पद्धतीने एका स्कूटरच्या मागे बांधून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर गंभीर जखमी झालेल्या कुत्र्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्कूटर चालवणाऱ्या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंजाबच्या पटियालामध्ये हा सगळा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या पटियाला शहराच्या सेंच्युरी एनक्लेव्ह भागामध्ये २० जून रोजी दोन महिला स्कूटरवरून जात होत्या. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले कि, “स्कूटरच्या मागे एका कुत्र्याला बांधलं होतं. मागे बसलेल्या महिलेने दोरी घट्ट पकडून ठेवली होती आणि या दोन महिला या कुत्र्याला अक्षरशः फरफटत घेऊन जात होत्या. हा प्रकार पाहिल्यानंतर आसपासच्या लोकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण या महिलांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.”

दरम्यान, हा सगळा प्रकार केल्यानंतर या महिलांनी कुत्र्याला सोडून दिले. परंतु, तोपर्यंत हा कुत्रा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यानंतर एका एनजीओने या कुत्र्यावर तात्काळ उपचार सुरु केले, पण त्याचा उपयोग झाला नाही. या निर्दयी घटनेनंतर ४ दिवसांनी (२४ जून) या कुत्र्याचा मृत्यू झाला. हा प्रकार समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.

पतियाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही महिलांविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० जून रोजी ही घटना घडल्यानंतर २४ जून रोजी कुत्र्याचा मृत्यू झाला. यानंतर संबंधित महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राणीमित्रांकडून या महिलांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पत्नीने केला विचित्र हट्ट, नवऱ्याने प्रेम सिद्ध करायच्या नादात गमावले दोन्ही हात

एका व्यक्तीने पोलिसांकडे दोन भुतांविरुध्द केली तक्रार, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली, कारण…

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago