देश

ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे बसला भीषण अपघात, 24 जखमी, चार जणांची प्रकृती चिंताजनक

झारखंड : झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात बसला भीषण अपघात झाला आहे. आज (३० जून) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास राजगंज पोलिस स्टेशन परिसरात जीटी रोडवर बस अनियंत्रित झाल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत सुमारे 24 जण जखमी झाले असून बस ड्रायव्हरसह चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बसने जीटी रोडवर उभ्या असलेल्या एका ट्रकला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली, त्यामुळे बसमधील सर्वजण जखमी झाले. बसमधील प्रवाश्यांनी सांगितले की ड्रायव्हरला झोप लागल्यामुळे बसने एका ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही बस बिहारच्या छपरा येथून कोलकाताकडे जात होती. बसमधील बहुतेक सर्व प्रवासी मजूर आहेत, जे कोलकाता येथे मजुरीसाठी निघाले होते. दरम्यान, या दुर्घटनेनंतर 5 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. नॅशनल हायवे सर्व्हिसची रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचली, त्यानंतर सर्व जखमींना एसएनएमएमसीएच धनबाद येथे आणण्यात आले.

क्रूरतेचा कळस! दोन महिलांनी कुत्र्याला स्कूटरला बांधून फरफटत नेलं, उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू

दरम्यान, हा अपघात इतका भीषण होते की अपघातानंतर बसचे मुख्य गेट जाम झाले होते, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आणि जखमींना बसमधून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने बसची खिडकी तोडून जखमी प्रवाश्यांना बाहेर काढले आणि रुग्णालयात पाठविले.

पत्नीने केला विचित्र हट्ट, नवऱ्याने प्रेम सिद्ध करायच्या नादात गमावले दोन्ही हात

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

10 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago