देश

पत्नीने केला विचित्र हट्ट, नवऱ्याने प्रेम सिद्ध करायच्या नादात गमावले दोन्ही हात

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील शामली येथील कैराना या गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने पत्नीच्या सांगण्यावरून 11 हजाराची हाय व्होल्टेज वायर पकडली. त्यातून हा माणूस वाचला पण त्याला दोन्ही हात गमवावे लागले आणि आता पत्नीच्या कुटुंबीयांनी तिला नदीमकडे पाठवण्यास नकार दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे सात वर्षांपूर्वी कैराना गावात राहणारा नदीम जवळच्या गावातील कांधला येथील सायमा या मुलीच्या प्रेमात पडला होता. नदीमचे मीटचे दुकान आहे. सायमा त्याच्या दुकानात यायची. याच दरम्यान दोघांचे प्रेम जुळले. प्रेमसंबंधानंतर गेल्या वर्षी दोघांचे लग्न झाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सायमा नदीमला सोडून तिच्या माहेरी गेली. नदीमने परत बोलावल्यानंतर सायमाने नदीमला विचारले की तो तिच्यासाठी काय करू शकतो? त्यावर नदीम म्हणाला की तुझ्यासाठी जीवही देऊ शकतो. त्यावर पत्नीने हट्ट करत नदीमसमोर 11 हजार हाय व्होल्टेज असलेली विद्युत तारेला स्पर्श करण्याची अट ठेवली. त्यानंतर नदीमने पुढचा मागचा विचार न करता विद्युत तारेला स्पर्श केला. या घटनेतून नदीम वाचला खरा, पण त्याचे दोन्ही हात कापावे लागले.

दरम्यान, नदिमने दोन्ही हात गमावल्यामुळे आता सायमाचे कुटुंबीय तिला नदीमबरोबर पाठवण्यास तयार नाहीत. त्यामुळे नदीम पत्नीला सासरी बोलावण्यासाठी एसपीच्या ऑफिसात पोहोचला. तेथे अर्ज देऊन नदीमने सासरच्या मंडळींवर शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. नदीम म्हणाला की तो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो आणि तो संपूर्ण आयुष्य तिचा चेहरा पाहून व्यतीत करेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago