Operation Sindoor: Indian Air Force Downs 5 Pakistani Aircraft and AEW&C; Air Chief Marshal A.P. Singh’s Big Reveal
बेंगळुरू : ऑपरेशन सिंदूर संदर्भात मोठा खुलासा करताना भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांनी शनिवारी सांगितले की, भारताच्या हवाई संरक्षण जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालींनी पाच पाकिस्तानी लढाऊ विमाने आणि एक AEW&C/ELINT विमान नष्ट केले. हे विशेष लष्करी विमान हवाई देखरेख आणि पूर्वसूचना यासाठी डिझाइन केलेले होते.
बेंगळुरू येथे आयोजित वार्षिक ‘एअर मार्शल कात्रे व्याख्यान’ कार्यक्रमात बोलताना एअर चीफ मार्शल सिंग यांनी सांगितले की, पाकिस्तानी लढाऊ विमाने ३०० किलोमीटर अंतरावर पाडण्यात आली. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानातील जैकबाबाद येथे पाकिस्तानी हवाई दलाची काही पार्क केलेली एफ-१६ लढाऊ विमाने देखील भारतीय हवाई दलाने यशस्वीरित्या नष्ट केली.
या खुलाशामुळे भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूरची व्याप्ती आणि भारतीय हवाई दलाची लढाऊ क्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…