देश

‘त्या’ तरुणांना पळता भुई थोडी… रोजच्या छेडछाडीला कंटाळून मुलींनी दिला चोप

राजस्थान : राजस्थानमधील अलवर येथील हमीरपूर गावात काही मुलींनी छेडछाड करणाऱ्या तरुणांना चोप दिल्याची घटना घडली आहे. रोज-रोज होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून या मुलींनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना अलवर जिल्ह्यातील हरसौरा पोलिस स्टेशन परिसरातील हमीरपूर गावातील आहे. काही तरुणांच्या दररोजच्या छेडछाडीमुळे त्रस्त झालेल्या मुलींनी या तरुणांना चांगलाच धडा शिकवला आहे. या मुलींनी आरोपी तरुणांना चोप दिला, त्यानंतर तरुणांविरूद्ध हरसौरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (६ जून) सायंकाळी काही मुली आपल्या शेतात गेल्या होत्या. त्यांना पाहून चार-पाच तरुणही तेथे आले आणि त्यांनी मुलींची छेड काढण्यास सुरुवात केली. ही या तरुणांची पहिली वेळ नव्हती. हे तरुण नेहमीच या मुलींना अशा प्रकारचा त्रास देत होते. या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर या मुलींनी रविवारी संध्याकाळी या आरोपी तरुणांना मारहाण करून धडा शिकविला.

या मुली म्हणाल्या की काही तरुण नेहमी त्यांच्याशी छेडछाड आणि गैरवर्तन करीत होते. त्यांना बर्‍याच वेळा समजावण्याचा प्रयत्न केला पण या तरुणांनी त्यांच्या सवयी सोडल्या नाहीत. मग आम्ही त्यांना धडा शिकवण्याचा विचार केला आणि चोप देऊन त्यांना पळ काढण्यास भाग पाडले. मुलींच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की त्यांनी अनेकदा या तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी दुर्लक्ष केले आणि दिवसेंदिवस त्यांची छेडछाड वाढतच चालली होती.

हरसौरा पोलिसांनी सांगितले की, मुलींच्या कुटुंबियांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुली आणि त्यांच्या कुटुंबियांनी या तरुणांविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पथक घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपी तरुणांना लवकरच अटक करण्यात येईल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago