देश

काही मिनिटात कळेल सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, वापरा ‘ही’ सोपी पद्धत

आजकालच्या दैनंदिन जीवनात एलपीजी सिलिंडर ही आपली एक मूलभूत गरज बनली आहे. विशेषत: शहरांमध्ये राहणारे लोक स्वयंपाकासाठी पूर्णपणे एलपीजी सिलिंडरवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत, अचानक रात्री किंवा धावपळीच्या वेळी सिलिंडर संपल्यास तो भरण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो आणि त्यामुळे आपल्यासमोर अडचण निर्माण होते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी आपण आज एक उपाय जाणून घेऊ. त्यामुळे आपल्या सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? हे आपल्याला आधीच माहित होऊ शकेल आणि त्यानुसार आपण नवीन सिलेंडर बुक करू शकता.

आपल्या सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे, हे शोधण्यासाठी प्रथम एक कापड पाण्यात भिजवून ओलं करून घ्या. आता या ओल्या कपड्याने सिलिंडरवर एक जाड रेषा काढा. यानंतर काही मिनिटे वाट बघा. आता आपल्या सिलिंडरचा जो भाग रिकामा असेल, तो भाग लवकर कोरडा होईल आणि जिथे गॅस शिल्लक आहे त्या भागावरील पाणी उशीरा कोरडे होईल. अशा प्रकारे आपण आपल्या सिलेंडरमध्ये गॅसचे प्रमाण किती आहे, हे सहजपणे शोधू शकता.

वास्तविक, सिलिंडरचा मोकळा भाग गरम असतो, म्हणून रिक्त भागातील पाणी लवकर कोरडे होते आणि गॅसने ​​भरलेला भाग त्यामानाने थंड असतो, त्यामुळे त्या भागातील पाणी उशीरा कोरडे होते. ही पद्धत आपल्याला किती गॅस शिल्लक आहे, हे समजण्यासाठी मदत करू शकते. तथापि, सिलेंडरमध्ये उरलेल्या गॅसचे प्रमाण समजण्याचा दुसरा उपायदेखील आहे, सिलेंडरचे वजन करून देखील आपण हे निश्चित करू शकतो.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago