देश

आपल्या ‘आधार’ चा वापर कुठे-कुठे केला गेला, ‘या’ सोप्या पद्धतीने घरबसल्या मिळवा माहिती

आधार कार्ड हे सध्याच्या काळात सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. जवळजवळ प्रत्येक शासकीय कामात आधार कार्ड आवश्यक असते. हे यूनीक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) जारी केले आहे. यात वापरकर्त्यांची बायोमेट्रिक आणि इतर माहिती नोंदवते. परंतु, बऱ्याचदा आपल्याला काळजी वाटते की आपल्या आधार तपशीलांचा गैरवापर तर केला जात नाही ना? जर अशी भीती वाटत असेल तर आपल्या आधारचा वापर नक्की कुठे-कुठे केला गेला आहे, हे आपण शोधू शकता.

UIDAI वेबसाइटवर आधार इतिहास (Aadhar History) सेवेद्वारे कार्डधारकांनी आतापर्यंत त्यांची आधार कार्ड कुठे वापरली आहेत, याबद्दल माहिती मिळू शकते. या सेवेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल नंबर अनिवार्य आहे. आधार कार्ड धारक मागील ६ महिन्यांत कोणत्याही प्रमाणीकरण युझर्स किंवा एजन्सीच्या वतीने (एयूए) केलेल्या सर्व प्रमाणीकरण रेकॉर्डचा तपशील पाहू शकतात. कोणताही आधार कार्ड धारक त्यांचा आधार क्रमांक / VID वापरून आणि वेबसाइटवर दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून त्यांचे आधार प्रमाणीकरण इतिहास UIDAI वेबसाइटवरून तपासू शकतात. तथापि, एका वेळी जास्तीत जास्त 50 रेकॉर्ड बघता येतात.

माहिती कशी मिळवाल :

  1. यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर भेट द्या.
  2. ‘माझा आधार’ पर्यायावर क्लिक करा.
  3. एक नवीन विभाग उघडेल, त्यावर ‘आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री’ वर क्लिक करा.
  4. तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रतिमा भरा.
  5. त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठविला जाईल.
  6. ओटीपी प्रविष्ट करा.
  7. दोन पर्यायांसह नवीन विंडो उघडेल : विंडो ऑथेंटिकेशन टाइप आणि डेटा रेंज.
  8. आधारच्या वापराशी संबंधित सर्व माहिती मिळेल.

आधार प्रमाणीकरण इतिहासावरून (आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री) आपल्याला कोणती माहिती मिळू शकते ?

  • ऑथेंटिकेशन कार्यक्षमता
  • ऑथेंटिकेशनची तारीख आणि वेळ.
  • UIDAI रिस्पॉन्स कोड
  • एयूए नाव
  • एयूए व्यवहार आयडी (कोडसह)
  • ऑथेंटिकेशन प्रतिक्रिया (यश की अपयश)
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago